मुंबईतील नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे वाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. मुंबई शहरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागांत लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Protected Content