Home क्राईम धक्कादायक : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दोन नराधमांकडून बलात्कार !

धक्कादायक : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दोन नराधमांकडून बलात्कार !


औरंगाबाद (वृत्तसंस्था) मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला भर दिवसा उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

पिडीत तरुणी तिच्या मित्रांसोबत सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली होती. भागतीमाता गडाच्या जंगलात एका ठिकाणी दोघं गप्पा मारत असताना तेथे काही अज्ञात तरुण आले आणि त्यांनी सगळ्यांना मारहाण केली. त्यानंतर पिडीत तरुणीला मित्रांसमोरून उचलून नेत तिच्यावर बलात्कार केला. आरोपी नराधमांनी तरुणीला जवळच्या खड्ड्यात नेले. तेव्हा मुलगी प्रचंड गयावया करत हात जोडले. पण, नराधानाने तिचे काहीही न ऐकता जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस नराधमांचा शोध घेत आहे.


Protected Content

Play sound