पिळोदे बु येथील मयत रेशन दुकानदाराच्या वारसास आर्थिक मदतीची मागणी

यावल, प्रतिनिधी :- तालुक्यातील पिळोदे बु, येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

संपुर्ण राज्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असुन, यावल तालुक्यात देखील मोठया प्रमाणावर कोवीड१९चा प्रसार ग्रामीण भागात वेगाने पसरतांना दिसुन येत असतांना तालुक्यातील मौजे पिळोदे बु. येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा ही कोरोना संसर्गाची लागण झाल्याने आजारामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. याकरीता शासनाने त्यांच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरॉसिन परवानाधारक संघाच्या वतीने करण्यात आली आहे . 

या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदार व केरॉसीन परवानाधारक संघाच्या वतीने आज दिनांक ४ मे रोजी तहसीलदार महेश पवार यांची भेट घेवुन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , विलास भिका जवरे, पिळोदे बु. तालुका यावल स्वस्त धान्य दुकान क्रमांक ६४ हे अन्नधान्य वाटप करीत असतांना कोरोनाबाधित झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असता, दिनांक ५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान ते मरण पावले असुन, तरी त्यांच्या कुटुंबास शासनाने ५० लाखाची आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली असुन या निवेदनावर संघाचे तालुका अध्यक्ष सुनिल बाळकृष्ण नेवे, तालुका उपाध्यक्ष शेख रसुल शेख अब्दुल्ला, सचिव दिलीप नेवे यांच्या स्वाक्षरी आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे उपस्थित होते .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.