कोरपावलीत संविधान दिन व शहिदांना श्रध्दांजली अर्पण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली येथे संविधान दिन आणि २६/११च्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवांनासाठी श्रध्दांजली अर्पण या कार्यक्रमाचे सामुहिक आयोजन करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली येथील ग्राम पंचायत व गोविंद बहुउद्देशीय संस्था कोरपावली यांच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान निर्माता परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच उद्देशिका व संविधानाचे सामूहिक वाचन करून पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव देविदास नागो तायडे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस व संवीधान प्रतिचे पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच विलास नारायण अडकमोल, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते नारायण अडकमोल यांनी व उपस्थितांना शपथ देत संविधानाचे सामुहीक वाचन करून मार्गदर्शन केले. तसेच मुंबई येथे २६/११च्या दहशदवादी हल्ल्यात विरमरण प्राप्त झालेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कोरपावली येथील ग्रामपंचायतीचे सदस्य अफरोज अन्वर पटेल, सत्तार समशेर तडवी, आरिफ तडवी, जुम्मा तडवी, दीपक नेहते, नागो तायडे, सुनील नेहते, सुखदेव इंधाटे, संविधान अडकमोल, गोलू अडकमोल ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी व इतर ग्रामस्य उपस्थित होते.

Protected Content