युवारंग महोत्सवाची जय्यत तयारी

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या युवारंग महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे आयोजित युवारंग-२०२३ च्या सर्वांगीण तयारी निमित्त आज सुकाणू समितीची बैठक पार पडली. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग महोत्सव दि. ९ ते १३ या पाच दिवसाच्या कालावधीत होणार्‍या भव्य सांस्कृतिक कला, ललित कला व विविध स्पर्धांची जय्यत तयारी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात होत आहे. पुढील पाच दिवस या ’युवारंग’ महोत्सवासाठी विविध प्रकारच्या ३२ समित्या कार्यरत असून जळगाव धुळे नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातून १०४ महाविद्यालयांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे त्यात सर्व मिळून १५६८ कलावंत ३८३ सहकलावंत, १७६ समूह व्यवस्थापक, उपस्थित असणार एकूण २७ कलाप्रकरांच्या सादरीकरणासाठी ०५ रंगमंच उभारण्यात आले आहेत.

या सर्व रंगमंचाना परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्यात आलेले आहेत. प्रतिभागी स्पर्धकांपैकी प्रथम द्वितीय,तृतीय या क्रमांकाचे पारितोषिक सह स्पेसियल चॅम्पियशिप फिरता चषक या सोबतच प्रत्येक जिल्ह्यासाठी उत्तेजनार्थ एक फिरता चषक हे पारितोषिक यावर्षी देण्यात येणार आहेत. तसेच पश्चिमात्य व नाट्य संगीत असे दोन नवीन कलाप्रकार यावर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी पाच दिवस निवासाची,जेवणाची व इतर सर्व साधनसामुग्रीची व्यवस्था अतिशय चोखपणे करण्यासाठी महविद्यालय सज्ज आहे असे मत प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले, तसेच विविध स्पर्धांची नियमावली आणि नियोजन या संदर्भात डॉक्टर सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले, तसेच डॉक्टर विनोद पाटील यांनी युवा रंग युवकांसाठी समाजासाठी व देशाच्या सांस्कृतिक विकासासाठी किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व पटवून दिले, विष्णू भंगाळे यांनी युवा रंगाची सुरुवात आणि आतापर्यंतचा प्रवास या संदर्भात सूचना व माहिती दिली, एकूणच सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांनी युवा रंग २०२३ कशा पद्धतीने यशस्वी करता येईल या बाबतीत माहिती दिली.

या प्रसंगी ’युवारंग२०२३’ सुकाणू समितीचे सदस्य डॉ.विनोद पाटील-कुलसचिव कावियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्राचार्य. डॉ.पी.आर.चौधरी, राजेंद्र नन्नवरे – कार्याध्यक्ष ’युवारंग२०२३’ व रज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, सदस्य, एस.आर.गोहिल-वित्त व लेखा अधिकारी, डॉ.सुनील कुलकर्णी-विद्यार्थी कल्याण अधिकारी, नवनियुक्त अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे,डॉ.सुनिता पालवे डॉ.शिवाजी पाटील, स्वप्नाली महाजन, नेहा जोशी तसेच डॉ.एस.व्ही.जाधव- समन्वयक यवरंग २०२३, डॉ.राकेश तळेले- सहसमन्वयक, उप प्राचार्य.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.एन.ए.भंगाळे, उपप्राचार्य. प्रा.विलास बोरोले, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ.विजय सोनजे, प्रा.उमाकांत पाटील व विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि जळगाव चे कर्मचारी जगदीश शिवदे, मच्छिंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content