यावल येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात सुशिक्षीत व समताधिष्ठीत समाज निर्माण करणारे कृतीशिल आदर्श शासनकर्ता, रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या पवित्र स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेस पुप्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, प्रा. सुभाष कांबडी, सईद शेख रशीद, मोहसीन खान, बापु जासुद, अरूण लोखंडे, मनोज येवले, संतोष ठाकुर, अय्युब खान, युवकचे गोलु माळी, माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, गणेश महाजन, भरत कोळी, एजाज पटेल, विजय साळी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. मुकेश येवले यांनी रयतेचा राजा छत्रपती शाहु महाराज यांचे जिवन व त्यांनी घेतलेल्या समाजातील सर्व घटकांसाठी क्रांतीकारक  निर्णयाची माहिती आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांना दिली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!