डांभूर्णी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कोरोना योध्द्यांचा ‘गौरव पत्र’ देवुन सन्मान

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तालुक्यातील आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. मनिषा महाजन आणि डांभूर्णी येथील वैद्यकिय अधिकारी यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव पत्र देवून सन्मान करण्यात आला.

सध्या आपल्या देशासह संपूर्ण जग हे कोरोना विषाणुसारख्या महामारीचा सामना करत आहे. सर्वत्र थैमान घालणऱ्या महामारी कमी करून नागरीकांचे सरंक्षण व्हावे म्हणून महाराष्ट्रमध्ये सरकार व प्रशासन तत्परतेने काम करत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डांभुर्णी येथे जाऊन समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. ऋण व्यक्त केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्य अध्यक्ष रविद्र नाना पाटील यांच्या संकल्पना व मार्गशन खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन, त्यांचे सर्व सहकारी आणि आशा वर्कर, अंगणवाडी सेविका कर्मचारी, वाहक तडवी यांचा सत्कार युवक राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. डॉ.मनीषा महाजन यांचा गौरव सत्कार आयोजक राज कोळी व देवकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे डॉ.सागर वारके, मंगला सोनवणे, जे.के. सोनवणे, प्रतिभा सोंनवणे डांभुर्णी प्राथमिक केंद्राचे आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांचा देखील कोरोना योद्धा म्हणून उपस्थित मान्यववरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोग्य विभागाच्या प्रमुख डॉ.मनीषा महाजन यांनी यावल तालुक्यात प्रत्येक प्राथमिक केंद्रात त ऑक्सिजनसाठी लागणारे ऑक्सीजन अन्सीलेटर हे यंत्र लोक सहभागातून घ्यावे आणि आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रसंगी उपस्थितांना केले .

यांनी घेतले परिश्रम
राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, उपजिल्ह्याअध्यक्ष राज कोळी, सरचिटणीस विनोद पाटील, सरचिटणीस प्रशांत पाटील, लीलाधर चौधरी, प्रमोद आबा, कुणाल चौधरी, भूषण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक युवकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार राज कोळी यांनी मानले.

Protected Content