तलाठी संघ व महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच !

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू माफियांनी साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ यावल तालुका तलाठी संघ आणी महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने यावल तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावुन सामुहिक रजा आंदोलन करण्यात येत असून आजही हे आंदोलन सुरूच आहे.

 

यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळु गौण खनिजची तस्करी करुन सुसाट वेगाने वाहतुक करण्यात येत आहे. यातच वाळु माफियांनी  निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावणारे साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप या अधिकार्‍यावर दोन दिवसापुर्वी आपले कर्तव्य बजावत असतांना नावरे फाटया जवळ ट्रॅक्टर व्दारे अवैधरित्या तहसीलच्या वाहनावर हल्ला केला होता. यात मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मारहाण करीत शिवीगाळ व जिवे ठार मारण्याचा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

यावल तालुक्यासह शहरात मोठया प्रमाणावर अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्‍यांचे प्रमाण वाढले असुन , स्थानिक पोलीस प्रशासन व  जिल्हाधिकारी या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी निर्णय घ्यावा अशा मागणीसाठी यावल तालुका संघाचे तालुक्यातील २६ तलाठी आणी ६ मंडळ अधिकारी यांचे महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने यावल तहसील मध्ये काळ्या फिती लावुन कामकाज केले जात आहे. तसेच, तलाठी  मंडळ अधिकारी यांचे मागण्या मान्य होईपर्यंत सामुहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

 

आंदोलनकर्त्यांचे शिष्ट मंडळ फैजपुर येथे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांची भेट घेवुन आपल्या मागण्याचे निवेदन सादर करणार आहे. या आंदोलनात आर. आय. कोळी , टी. सी. बारेला, समिर तडवी, एस. व्ही. सुर्यवंशी , एम. एम. तडवी , पु यु बाझुळकर, व्ही. आर. तडवी , एस. एल. पाटील, एस. जी. बाबर, एम. जी. देवरे, व्ही. बी. नागरे, एन. जे. धांडे, एच. व्ही. वाघ, एल. एम. देशवतार, एस. व्ही. गोसावी , ए. वाय. बडगुजर , एन. बी. तडवी यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी तीन दिवसापासुन सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Protected Content