सतपंथ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सतपंथ मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त येथील सतपंथ मंदिरात दिनांक ३० जुलै २३ पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ३० जून ते २ जुलै दरम्यान ब्रह्मावतार ज्ञानामृत पारायण सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि रात्री आठ वाजता भजन, संकीर्तन असा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सतपंथ मंदिरामध्ये विटवा, निंबोल, चिनावल, कुंभारखेडा, रावेर, यावल, खडका, फैजपूर तसेच परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील भाविक भक्त येथील सतपंथ मंदिरात ब्रम्हावतार ज्ञानामृत ग्रंथराज पारायणासाठी बसलेले आहेत.

दरम्यान, ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमानिमित्त सकाळी पाच वाजता घटपाट महापूजा तसेच दिक्षाविधी, साडेआठ वाजता पाद्य पूजा व गुरुपूजन, सकाळी नऊ वाजता आशीर्वाद आणि अकरा वाजता महाप्रसाद तसेच सकाळी ११ ते संध्याकाळी ४-०० दरम्यान महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा दर्शन सोहळा व रात्री आठ ते साडेनऊ सतपंथ ज्योत मंदिर धानोरा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वचन असा कार्यक्रम होणार आहे.

सर्व भावीक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सतपंथ मंदिर संस्थान यांनी केले आहे.

Protected Content