धरणगावात आ. गुलाबराव पाटील समर्थकांचे राजीनामासत्र !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे मंत्रीमंडळाचा विस्ताराची उत्सुकता शिगेला पोहचली असतांनाच माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी आज राजीनामासत्र सुरू केल्याचे दिसून आले आहे.

राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची साथ घेतली असून त्यांचा पहिल्याच टप्यात मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आमदार पाटील हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर धरणगावात शिवसेनेचा मेळावा देखील घेण्यात आला होता. तेव्हाच  गुलाबभाऊ समर्थकांनी याकडे पाठ फिरवली होती. तर मध्यंतरी मतदारसंघातील सर्व महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांची सोबत कायम राखणार असल्याची ग्वाही दिली होती.

या अनुषंगाने आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील आणि शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनाच जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. या पाठोपाठ आता जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी आपापल्या पदांचे राजीनामे देऊन आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.