सुशांत आत्महत्या : पाटणा पोलिसांनी केली कोटक महिंद्रा बँकेत चौकशी

मुबंई (वृत्तसंस्था) युरोपला गेल्यानंतर रियाने सुशांतच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढले, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस तपास करत आहेत. पाटणा पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेत सुशांतच्या कंपनीच्या बँक खात्याबाबत चौकशी केली.

 

सुशांतच्या रियालीटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपणीचे खाते वांद्रे येथील कोटक महिंद्रा बँकेत आहे. बिहार पोलिसांनी बँक मॅनेजरकडून २०१८ ते २०२० दरम्यानच्या सर्व व्यवहाराची माहीती घेतली. पोलिसांनी जवळपास २ तास बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपये गहाळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस सुशांतच्या कंपनीचे बँक खाते असलेल्या वांद्रे येथील कोटक महिंद्रा बँकेतून माहिती घेतली आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी चांगलं सहकार्य केल्याची माहिती पाटणा पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Protected Content