अजून काही दिवस शाळा बंद ; राजेश टोपे

मुंबई वृत्तसंस्था | “कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं असून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरु करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.” असे म्हणत राज्यातील शाळा अजून काही दिवस शाळा बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज सायंकाळी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती देतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे असून कोरोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ ते २० दिवस बंद राहणार आहेत”

यावेळी मंत्री टोपे म्हणाले, “मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असून आज राज्यात ४६ हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना कमी होतोय असे समजू नये. १४ टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!