बाहेती महाविद्यालयात ‘कथाकथना’चा कार्यक्रम संपन्न

जळगाव प्रतिनिधी | ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त शहरातील ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात ऑनलाइन कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

गुरुवार, दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालयात कथाकार, प्रा.गोपीचंद धनगर यांचा ऑनलाइन कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न आयोजित करण्यात आला होता.

प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने ‘मराठी भाषा पंधरवडा’निमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कथाकार, प्रा.गोपीचंद धनगर यांनी आपल्या ‘दिवटी’ या स्वरचित कथेचं बहारदार सादरीकरण केलं. ग्रामीण बोलीतील संवाद आणि खानदेशातील ‘हेडे’ या लोकसाहित्यातील मौखिक कलाप्रकाराचं गायन हे कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं.

आवाजातील चढ उतार, दृश्यात्मकता, सादरीकरणाची शैली यामुळे या कार्यक्रमास विद्यार्थी आणि साहित्य रसिकांचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.मोरेश्वर सोनार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.रेणुका झांबरे यांनी केलं.

Protected Content