पारोळा येथील गुरांचा बाजार लंपी आजारामुळे उद्यापासून राहणार बंद

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जनावरांवरील लंपी  आजाराचा  संसर्ग वाढू नये याकरिता पारोळा येथील गुरांचा बाजार उद्यापासून बंद ठेवण्यात येणार असून शेतकरी बांधवानी व व्यापाऱ्यांनी आपली गुरे ढोरे विक्रीस आणू नये असे आवाहन  पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. सध्या जळगाव  जिल्हातील आठ तालुक्यातील २९ गावात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या साथ रोगाचा आजाराचे जनावरे आढळून  आले आहेत.  या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्हात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष  अभिजित राऊत यांच्या  दि. ६ सप्टेंबर रोजीच्या  आदेशांनुसार पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा आठवडे बाजार उद्या रविवार दि. ११ सप्टेंबरपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. तरी शेतकरी बंधूनी आपले गुरे-ढोरे विक्रीस आणू नये असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक जी.एच.पाटील, सचिव रमेश चौधरी यांनी केले आहे.

 

Protected Content