माहिती अधिकार फेडरेशनचा एक दिवसीय कार्यकर्ता मेळावा जळगावात संपन्न

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा एक दिवसीय कार्यकर्ता मेळावा जळगाव येथील रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

सदर मेळाव्यास फेडरेशनचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते . सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मार्गदर्शन केले .

सुभाष बसवेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रामुख्याने सांगितले की, ” प्रशासन पारदर्शक , लोकाभिमुख व जबाबदार रहावे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा , सरकारी कार्यालयातील जनतेची अडलेली कामे त्वरित व्हावीत या उद्देशाने माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन कार्य करीत आहे.

परंतु प्रशासन व शासन माहिती अधिकार कायद्याविषयी उदासीन आहे . लोकांना थेट अधिकार देणारा व सोयीस्कर असणारा कायदा प्रभावीपणे राबवावा अशी शासनाची मानसिकता व ईच्छा शक्ती राहिलेली नाही , अशा विपरीत परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणुन जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. हे कार्य असेच सुरू रहावे व वाढवावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली .” तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावीपणे काम कसे करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले. सुत्रसंचलन राजधर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन गुणवंतराव सोनवणे यांनी केले.

सदर मेळाव्यास जिल्हाध्यक्ष आरिफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे, नरेंद्र सपकाळे , पंकज पाटिल , राहुल पाटिल , भिकन चौधरी , दिपक घोगरे , सचिन पाटिल , राजू खडके , भगवान चौधरी , चंद्रकांत श्रावणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content