मू. जे. महाविद्यालयात आंतरविभागीय महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत आंतर विभागीय महिला क्रिकेट २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर करण्यात आलेले आहे. यास्पर्धेचे उद्घाटन मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मू. जे. महाविद्यालय जिमखाना समिती चे चेअरमन डॉ. सी.पी.लभाने, समिती सदस्य डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. एम.एन. लीधुरे, नांदूरबार विभागाचे प्रा. डॉ. राजेश सोनवणे, प्रा. डॉ. भरत चांदसे, धुळे विभागाचे प्रा. अमोल ठाकूर, प्रा. पूजा जैन, एरंडोल विभागाचे प्रा. सचिन पाटील, डॉ. विजय पाटील व जळगांव विभागातर्फे डॉ. नवनीत आसी, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. सचिन झोपे, प्रा. देवदत्त पाटील तसेच जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव व मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.

सदर स्पर्धेत चारही विभागाचे संघ सहभाग घेत आहेत. या स्पर्धेच्या लढती १३ व १४ डिसेंबर २०२२ दरम्यान होत आहेत. स्पर्धेचा पहिला सामना जळगांव विभाग विरुध्द एरंडोल विभाग यांच्यात झाला यामध्ये जळगांव विभागाने उत्कृष्ठ कामगिरी करत विजय संपादन केले. जळगांव विभागातर्फे मू.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनिंनी चमकदार कामगिरी केली. जळगांव संघाचा पुढील सामना १४ डिसेंबर रोजी खेळवला जाईल. स्पर्धेत डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. सचिन झोपे व प्रा. देवदत्त पाटील निवड समिती सदस्य म्हणून काम पाहत आहेत. सदर स्पर्धा ह्या मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत.

Protected Content