शिरसोलीच्या एका भागातील महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागात राहणारी ४० वर्षीय महिलेचा शेतात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागात राहणारी ४० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास महिला शेतात गेली असता शेताच्या बांधावर सुनील आत्माराम महाजन याने महिलेचा हात धरून विनयभंग करत अश्लिल चाळे केले. याप्रकरणी महिलेने शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुनील आत्माराम महाजन यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे करीत आहे.

Protected Content