दादा नेवे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

chopada 4

चोपडा प्रतिनिधी । पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या विशेष उपस्थितीत पुण्यातील एका छोट्या कार्यक्रमात जळगाव जिल्हा बँक असोसिएशनने नुकतेच दादा नेवे यांना शिवरत्न पुरस्काराने सन्मानित केले आणि चोपडा पीपल्स बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवचरित्र व्याख्याते, जिल्हा बँक असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जळगाव पिपल्स बँकेचे संचालक दादा नेवे यांना असोसिएशनच्या वतीने शिवरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांच्या खास उपस्थितीत हा सोहळा व्हावा, अशी असोसिएशनची इच्छा होती. मध्यंतरी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते येऊ शकत नाही. त्यानंतर असोसिएशनचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी पुणे येथे एका छोट्याखाणी कार्यक्रमात त्यांना बोलविण्यात येवून त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रहास गुजराथी यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. चोपडा पिपल्स बँकेच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी खान्देशाची आठवण करत त्यांनी सांगितले की, खान्देशाला ऐतिहासिक वारसा दिला आहे. त्यामुळे मला एकदा खान्देशात यायचे आहे आणि चोपड्यात येण्याची जास्त इच्छा आहे. दिवाळी नंतर मी चोपड्याला नक्कीच येईन अशी इच्छा त्यांनी यावेळी प्रगट केल्याने चोपडा पिपल्स बँकेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

चोपडा पिपल्स बँकांच्या वतीने चंद्रहासभाई गुजराथी यांनी सत्कार केला. यावेळी त्यांचासोबत असो.चे अध्यक्ष सतीश मदाने, जळगाव पिपल्स बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष पंकज मुदंडा, तज्ञ संचालक जे.एम.अग्रवाल, रावेर पिपल्स बँकचे चेअरमन ज्ञानेश्वर महाजन, संचालक डॉ. नरेंद्र शिरसाट, शरदशेठ यावलकर, सूर्यभान चौधरी, शांता वाणी, प्रकाश कोठारी, चोपडा पिपल्स बँकचे मोरेश्वर देसाई, ऍड रविंद्र जैन, नेमीचंद जैन, सुनील पाटील, विलास बोरोले, डॉ.सी.बी.चौधरी, मुख्य कार्यकारणी संचालक दिलीप देशमुख व्यवस्थापक देविदास पाटील यांच्यासह आदी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर बँकांच्या संचालिका वसूधरा लांडगे यांनी केले.

Protected Content