राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाचे यश

512de457 e52e 4e92 8aee 3ac3e53392ab

 

चोपडा (प्रतिनिधी) येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने रोटरी क्लब व इनरव्हिल क्लब चोपडातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

 

येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने रोटरी क्लब व इनरव्हिल क्लब चोपडातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल चोपडा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश गांगुर्डे व इतर मान्यवरांच्या हस्ते संघास बक्षिस देवून गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी पाटील, अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील , प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा डॉ. ए.एल. चौधरी, डॉ. के.एन. सोनवणे, प्रा.बी. एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा. व्ही. वाय. पाटील, रजिस्ट्रार डी.एम. पाटील व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. त्यांना संगीत शिक्षक किशोर राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content