मोटरसायकलींची समोरा समोर धडक ; दोन गंभीर जखमी

accident

 

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव गिरडगाव दरम्यान दोन मोटरसायकलीचा समोरा समोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाली असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

या संदर्भातील अधिक असे की, दिनांक १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ४.३o वाजेच्या दरम्यान बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील किनगाव-गिरडगाव गावाच्या दरम्यान तोल काट्याजवळ दोन मोटर सायकलींची समोर-समोर धडक झाली. या अपघातात कसुंबा तालुका रावेर येथील राहणार सुलेमान झिपरू तडवी (वय ६०) आणि राजेन्द्र जनार्दन झाल्टे (वय ३५, रा,आंदलवाडी ता. रावेर) हे जखमी झाले असून यातील सुलेमान झिपरू तडवी यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. दोघं जखमींवर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे वृत आहे.

Protected Content