कब्रस्तानजवळील अनाधिकृत बांधकाम त्वरित थांबवावे !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुस्लिम कब्रस्तान परिसरात सुरू असलेले अनाधिकृत बांधकाम त्वरित थांबवावे. अशा मागणीचे निवेदन बुधवारी १९ ऑक्टोबर रेाजी मुस्लिम कब्रस्तान कमेटीतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना देण्यात आले.

 

निवेदन देतांना यांची प्रमुख उपस्थिती
निवेदन देते प्रसंगी मुस्लिम कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष मुस्लिम बागवान, मा. नगरसेवक रसुल उस्मान शेख, मुख्तार शाह मोहम्मद शाह, शेख लतीफ शेख शब्बीर, अॅड. अमजद पठाण, साजीद खान अय्युब खान, हुसेन हसन शेख, मतीन बागवान, वसीम शेख, बशीर खान महेताब खान, निसार पिंजारी, फारुक पिंजारी, निहाल बागवान, गफ्फार गयास, आबिद मिर्झा, अन्सार पटवे, नाजिम खान अय्युब खान, शेख इरफान शेख गफ्फार उपस्थित होते.

 

निवेदनात म्हटले आहे की,
पाचोरा शहरात नगर परिषद क्षेत्रातील नवगजा पुलाजवळ हिवरा नदीला लागुन कृष्णापुरी सर्वे नं. १०६ / ब येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. ह्या जागेवर मुस्लिम लोकांचे दफनविधी केले जातात. ही जागा एकुण २८ आर इतकी असुन त्यातील २० आर जागेला न. पा. कडुन १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंपाऊंड करुन मिळाले आहे. व उर्वरित ८ आर जागा ही नवगोजी बाबाची दर्गा सुशोभीकरणासाठी व दफन विधीचे साहित्य ठेवण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र या जागेवर नगर पालिका कर्मचारी अनिल पाटील यांनी बळजबरीने जे. सी. बी. द्वारे खड्डे करुन खडी टाकुन‌ दर्गाचे जागेवर कब्जा करुन विना परवानगी अनाधिकृत बांधकाम करीत आहे. गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मितेचा विचार व्हावा. आपण कटाक्षाने या प्रकरणाची दखल घेवुन त्वरित मुस्लिम कब्रस्तान परिसर व दर्गाच्या जागेवर होणारे अतिक्रमण तसेच विनापरवानगी अनाधिकृत बांधकाम व पत्र्याचे शेड सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे. तसे न झाल्यास मुस्लिम समाज बांधव आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करेल. व होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. अशा आषयाचे निवेदन मुस्लिम कब्रस्तान कमेटीतर्फे नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (पाचोरा), तहसिलदार (पाचोरा), पोलिस निरीक्षक (पाचोरा) तसेच सर्व प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचे प्रतिनिधींना देण्यात आले आहे.

Protected Content