इंडियन रेडक्रॉसतर्फे फिरता दवखान्याद्वारे शनिपेठ परिसरात सेवा

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नयेसाठी लॉक डाऊन जाहीर करण्यातआला आहे. या कालावधीत हॉटेल व भोजनालये बंद असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना जेवण मिळत नसल्याने अशांसाठी रेडक्रॉसतर्फे जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासोबत फिरता दवाखाना व औषधोपचार गाडीने आज महापौर भारतीताई सोनवणे यांच्या उपस्थतीत शनिपेठ परिसरात सेवा देण्यात आली.

शहरातील हाॅटेल व भोजनालये बंद असल्याने हाॅस्पिटल मध्ये रूग्णांसोबत राहात असलेल्या नातेवाईकांना दोन्ही वेळच्या जेवणाची सोय रेडक्रॉसच्या वतीने करण्यात येत आहे. : आज महापौर भारतीताई सोनवणे यांच्या शनीपेठ परिसरात रेडक्रॉसची फिरता दवाखाना व औषधोपचार गाडीने सेवा देण्यात आली. २२० रुग्णांना या सेवेचा लाभ घेतला. तरी जेवणासाठी रुग्णांच्या  नातेवाईकांनी ८७८८८४१४६५ याक्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content