अन्यायग्रस्त आदिवासींच्या न्यायासाठी बेमुदत धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात विविध गावांमध्ये भिल समाजातील ग्रामस्थांना जातिवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करणे, नाहक त्रास देण्याच्या प्रकारात वाढ होत असून  याला आळा घालून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी एकता परिषद भारततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार दि. २९ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

 

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की,  किनगाव येथील आदिवासी समाजाच्या शिवदास रोहिदास भिल या तरुणाचा जळगाव येथे खून झाला आहे. या खुनातील  आरोपी  अमोल देविदास महाजन व किरण जगदीश कंडारे यांच्यावर ३०२ प्रमाणे व अट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा. शिवदास रोहिदास भिल यांचे प्रकरण पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावे आदी मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात राज्य संपर्कप्रमुख सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष एकनाथ आहिरे, भगवान मोरे, सुधाकर सोनवणे, लहू मोरे,  सुनील वाघ, धर्मा भिल साईनाथ सोनवणे, बापू मोरे आदीं सहभागी झाले आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/584464953221074

 

Protected Content