निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माध्यम कक्षास भेट

WhatsApp Image 2019 04 15 at 6.31.24 PM

 जळगाव (प्रतिनिधी)  लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षास आज जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संयुक्त भेट दिली.

 

यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील आदि उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मीडीया कक्षातील दैनंदिन कामकाजाची माहिती दिली.लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मीडीया कक्षामार्फत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या वर्तमानपत्र,  इलेक्ट्रॉनिक्स चॅनेल,  आकाशवाणी,  एफएम चॅनेल,  स्थानिक केबल,  सोशल मिडीयावर देण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे,  पेडन्युज संदर्भात कार्यवाही करणे,  विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचे विश्लेषण करुन त्याचा अहवाल निवडणूक निरिक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांना दररोज सादर केला जातो.  यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे व श्री. गाडीलकर यांनी श्री. बोडके यांच्याकडून निवडणूक कालावधीत वर्तमानपत्रात आलेल्या जाहिराती,  पेडन्यूज, सोशल मिडीया, आकाशवाणी,  एफएम,  इलेक्ट्रॉनिक्स मिडीयावरुन व स्थानिक केबलवरुन प्रसारीत होणाऱ्या जाहिरातींचे आतापर्यंत करण्यात आलेले प्रमाणीकरणाची माहिती घेतली.  तसेच जाहिरात प्रमाणीत करण्यासाठी आलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना दिल्यात.  दैनंदिन बातम्या व जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवणे, प्रमाणीत करुन देण्यात आलेल्या जाहिरातींच्या खर्चाची माहिती तात्काळ निवडणूक खर्च शाखेस देण्याबाबतही सूचना दिल्या.

 

Add Comment

Protected Content