ब्रह्माकुमारीज संस्थेच्या चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनासं उत्सहात प्रारंभ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ब्रह्माकुमारीज संस्थे मार्फत मीडिया विंगद्वारे शांतिवनमध्ये चार दिवसीय राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे  अबु रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील काही पत्रकार बांधव सहभागी झाले आहेत.

 

व्यवसायासोबतच वैयक्तिक संतुलन साधल्यास मूल्याधिष्ठित समाज निर्मिती लवकर होणार असल्याचे प्रतिपादन बी. के. शिवानी यांनी केले. त्या अबु रोड येथे आयोजित चार दिवशीय राष्ट्रीय मीडिया संमेलनाच्या स्वागत सत्रात दि. २९ आॅगस्ट रोजी संबोधित करीत होत्या.  याप्रसंगी त्यांनी श्री गणराचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. प्रारंभी बी. के. सतीश गुप्ता मधुरवाणी ग्रुप कडून गीत तर शिवशक्ती सांस्कृतिक ग्रुप (बेंगलोर) आणि स्टार जल्सा ग्रुप (खरकपुर) यांच्याकडून संगीतनृत्य सादर करण्यात आले.

प्रजापिता ब्रम्हाकुमारिज संस्थांचे दि. २९ रोजी चे मुख्य प्रशासिका ब्र. कु. दादी रतनमोहिनी, ब्र. कु. मुन्नी दीदी ब्रम्हकुमरिज जॉइंट चीफ, मोटिवेशनल स्पीकर बी.के. शिवानी दीदी, बी. के. आतम प्रकाश ब्रम्हाकुमरिज मीडियाविंग उपाध्यक्ष, बी. के. शिविका संस्था, मीडिया प्रभाग मुख्यलाय   कॉर्डिनेटर, बी. के. शांतनू, संस्थेचे मीडियाविंग नॅशनल कोर्डिनेटर बी. के. निकुंज, बी. के. त्रिपाठी, बी. के. हरिहर बिरही नेपाल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कोरोना काळातील संपूर्ण भारतातील जवळपास ८०० सर्व मिडिया विभागातील पत्रकार  यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली

ब्र. कु. जयंती दीदी ब्रहमाकुमरिज संस्था संयुक्त प्रशासिका यांनी ऑनलाईन सर्व मीडिया कर्मचारी, प्रतिनिधीं यांना शुभेच्छा दिल्या  ब्र. कु. शिविका शिक्षा विभाग कॉर्डनेटर यांनी   ब्रम्हाकुमरिज संस्थेची स्थापना, उद्दिष्ट, कार्य, जगभरातील सेवा याबद्दल माहिती दिली.

आजादी के अमृत महोत्सवाकडून  स्वर्णीम भारत कडे या अंतर्गत “समाधान परक पत्रकारिता से समृद्ध भारत की ओर” या विषयावर आजपासून पुढील चार दिवस तज्ञाकडून विचारविमर्श होणार आहे. श्रीगणेश याचे प्रतिमा त्यांच्या जवळील साधन व गुणांचे महत्व सांगून त्यांच्यातले चांगले गुण धारण करून आपल्यातील जे अवगुण असतील तसेच जीवनातील आलेल्या संकटातील परिस्थिती मात करून आपल्या जीवनात दुखहर्ता सुखकर्ता  बनून सुख, शांती, आनंद,  प्रेम व खुशी  हे आपले सर्वाचे संस्कार धारण करायचे आहे आणि येणाऱ्या स्वर्णीम भारत चे आपण साक्षीदार बनणार आहोत असे सर्व उपस्थित मीडिया कर्मचारी यांना बी. के. शिवानी दीदी  यांनी आवाहन केले तसेच यावेळी लेखक निकुंज मुंबई महारष्ट्र, हरिहर बिरही (नेपाल), एस. एस. त्रिपाठी यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, कोरोनाकाळाच्या तीन वर्षानंतर ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे या उद्घाटन सम्मेलन प्रसंगी देश भरातून जवळपास १ हजार ९००  प्रिंट – इलेक्ट्रानिक मीडिया पत्रकार, रेडियो पत्रकार, संपादक  एंकर , ग्रामीण पत्रकार यांची उपस्थिती आहे. अशी माहिती महाराष्ट्र समन्वयक, डॉ सोमनाथ वडनेरे यांनी दिली.

Protected Content