के.सी.ई. अमृत दौडला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व के.सी.ई. सोसायटीच्या विद्यमाने सोमवार, दि. 29 ऑगस्ट रोजी अमृत दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

या मॅरेथॉनमध्ये मू. जे. महाविद्यालय, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एस. एस. मणियार लॉ कॉलेज, आय. एम. आर. कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, बीएड व बीपीएड कॉलेज, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, ओरियन सीबीएसई स्कूल, ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल अशा दहा शाखांच्या एकंदर 800 विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 5 किमी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी 3 किमीचे नियोजित अंतर होते.

या मॅरेथॉनचे उदघाटन के.सी.ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व जळगाव जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी के.सी.ई. च्या सर्व शाखांचे प्रमुख व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजन
एकलव्य क्रीडा संकुलतर्फे करण्यात आले होते. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मॅरेथॉन साठीचे तांत्रिक सहकार्य केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेली ही अमृत दौड मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. रणजीत पाटील, प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, प्रा. देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे आणि के.सी.ई. च्या सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

मॅरेथॉनचा अंतिम निकाल:-

शालेय मुले
1) सूचित निलेश सांगोळे – ए.टी. झांबरे
2) हर्षल रामसिंग बोरसे – ए.टी. झांबरे
3) यश हेमराज झटके – ओरीऑन स्टेट बोर्ड स्कुल
4) ऋग्वेद सचिन वाणी – ओरीऑन सी.बी.एस.सी स्कुल
5) आदित्य संदीप कुलकर्णी – ए.टी. झांबरे
6) मोहित मधुकर गुजर – ओरीऑन स्टेट बोर्ड स्कुल

शालेय मुली
1) आकांशा गोरख म्हेत्रे – ओरीऑन स्टेट बोर्ड स्कुल
2) दिव्या विकास मोरे – ओरीऑन स्टेट बोर्ड स्कुल
3) भाग्यश्री पुरुषोत्तम दुसाने – ए.टी.झांबरे
4) पलक विवेक चौधरी – ओरीऑन सी. बी. एस. सी. स्कुल
5) लक्ष्मी अनिल फालक – ओरीऑन स्टेट बोर्ड स्कुल
6) साची विशाल इंगळे – ओरीऑन सी. बी. एस. सी. स्कुल

कॉलेज- मुले
1) हितेंद्र दिनकर पाटील – एम.जे.कॉलेज
2) चेतन राजेश सोनवणे – स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज
3) योगेश जगतराव पाटील – एम.जे.कॉलेज
4) परेश ईश्वर पाटील – पी.जी.कॉलेज
5) भूषण आलोक ठाकरे – एम.जे. कॉलेज
6) दिपक कैलास काळे – आय.एम.आर कॉलेज

कॉलेज – मुली
1) वैशाली महेंद्र जमाले – एम.जे. कॉलेज
2) मंजू किशोर मासोळे – एम.जे. कॉलेज
3) योगिता विनोद निकम – स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज
4) रिंकू महावीर सैनी – एम.जे. कॉलेज
5) रोहिणी बाजीराव पाटील – एम.जे. कॉलेज
6) साक्षी प्रमोद जोगी – आय.एम.आर. कॉलेज

Protected Content