धरणगावात रंगली कुस्ती स्पर्धा

धरणगाव प्रतिनिधी । येथील व्यायाम प्रसारक मंडळातर्फे धरणगाव येथे मरीमाता उत्सव निमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले.

या वर्षात मानाची कुस्ती २ लाख ५१ हजार रुपये व गदा या पारितोषीकासाठी होती. यात महाराष्ट्र केसरी बाला रफीकने हरियाणाच्या भारत केसरी तेजविर पुनिया याला चीत करून विजय मिळवला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते खान्देश केसरी विजेता बाला रफिक यास पुरस्कार देऊन सन्मान केला. दरम्यान, महिलांच्या कुस्ती स्पर्धांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यात साक्षी शिंदे धुळे, पूजा तायडे धुळे, लट्टू पहिलवान धुळे, नील पाटील धुळे, हितेश पैलवान पाचोरा, सोपान पहिलवान पिंपळनेर, कुसुम पूनिया राजस्थान, किशन पूनिया हरियाणा, प्रवीण जाधव धुळे यांचा समावेश होता.

Protected Content