पाल येथील सरपंचपदी हजरा तडवी यांची निवड

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाल या आदिवासी गावच्या सरपंचपदी हजरा कामिल तडवी यांची तर उपसरपंचपदी ललिता पवार यांची निवड झाली आहे. पॅनलचे प्रमुख कामील तडवी, पिंटू पवार यांच्या राजकीय खेळीने विरोधक चितपट झाले आहे.

अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या सरपंच उपसरपंच पदावर निवडणूक पूर्वी दावे-प्रतिदावे केले जात होते.आहे.पॅनल प्रमुख कामिल तडवी पिंटु पवार यांच्या राजकीय खेळीमुळे सरपंच पदावर हजरा कामील तडवी तर उपसरपंच ललिता पवार विराजमान झाले आहे. निवड झाल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी यांनी सर्वांचे अभीनंदन केले. यावेळी ग्राम पंचायत मीना रौनक तडवी, उमर रमजान तडवी, शबिस्ता तडवी, सलिम सुभान तडवी, गणेश रघुनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Protected Content