जळगावात भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे बेमुदत उपोषण (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भिम आर्मी संविधान रक्षक दलाच्या यावल तालुका युनिटतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे.

 

यावल तालुक्यातील मौजे बोराळे ग्रामपंचायतीने  २०१० पासूनचे केलेल्या विकास कामांची चौकशी करण्यात आली आहे. चुंचाळे येथे लाखो रुपयांचे गौण खनिजांची चोरी झाल असून त्याची चौकशी करण्यात यावी. चुंचाळे येथील  रहिवाशी विठ्ठल तुकाराम अवचार यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले घरकुल बांधून मिळावे या व  इतर मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. हे उपोषण यावल तालुका संघटक राजू वानखेडे व यावल तालुका अध्यक्ष सचिन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले आहे. या उपोषणात सुपडू संदानशिव, शिवाजी गाजरे, विनोद सोनवणे, करण ठाकरे, ज्ञानेश्वर अपचार, विठ्ठल अपचार, विमलबाई अपचार आदी सहभागी झाले आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/594473352319202

 

Protected Content