चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने वादंग : राज्यभरात विरोध

पैठण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रकांत पाटील यांनी आज महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज पैठणमधील कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली ! या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. शाळा कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपालांसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यात आता ना. चंद्रकांत पाटील यांची भर पडली असून त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात येत आहे.

Protected Content