हिजाब बंदी योग्यच, कर्नाटक हायकोर्टाचा मोठा निर्णय

बंगळुरू – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टने आज, 15 मार्च रोजी आपला निकाल दिला असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाबवरील बंद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळून लावली.

हिजाब प्रकरणी हायकोर्टचे (मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तो म्हणजे, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी  योग्यच आहे. ‘हिजाब’ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची टिप्पणी देखील यावेळी कर्नाटक हायकोर्टाने दिली आहे. हिजाबवरील बंद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळून लावली.

मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी निकालाच्या एक दिवस आधीच बंगळुरु शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. याशिवाय शिमोगा कलबुर्गीमध्येही कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर 21 मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा, सार्वजनिक मेळावे, आंदोलन, निषेध रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्यातील अनेक शहरात शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, उडपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या 6 विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यांना विरोध करण्यात आला होता. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता. या वादाचे लोण कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये देखील पोहोचला होता. त्यानंतर काही काही हिंदू विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना भगवी शाल किंवा स्कार्फ घालून येऊ लागल्याने तणाव आणखी वाढला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि भगवी शाल किंवा स्कार्फ या दोन्हींवर बंदी घालण्याचा आदेश जारी केले होते. त्यानंतर हिजाब वादावरून देशातील अनेक शहरात रान पेटले होते. आंदोलने सुरू झाली होती. अनेक मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

दरम्यान,हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात 10000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राखीव पोलिस दल आणि शहर सशस्त्र राखीव दलच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

बंगळुरुचे पोलिस आयुक्त यांनी सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. शहरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (14 मार्च) रात्री 8 वाजेपासून ते 19 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यत कलम 144 लागू करण्यात आले आहेत. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Protected Content