होळीच्या गाठीचा ओसरतोय गोडवा…!

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या दिवशी हमखास गाठींची खरेदी केली जाते. शिवाय उन्हाळ्याची चाहुल लागली की लगेच गाठींची आठवण होते. सध्याच्या आधुनिक तंत्रयुगात जुन्या प्रथा, परंपरा मागे पडत आहेत. सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल याचे सुतोवाच देतो. मात्र ही प्रथा कुठेतरी मागे पडत असल्याचे अलिकडच्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. यंदा तर गाठीच्या विक्रीतही घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

होळी आणि रंगपंचमीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. द्वेष क्लेश काढून मन निर्मल करणारा हा सण आहे. या सणांमध्ये तोंड गोड केल्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण संपूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे होळीच्या सणाला गाठीचे एक खास विशेष महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत असली तरी शहरातील दुकाने सध्या रंगबिरंगी गठ्यानी सजलेली आहेत.

होळी पूजन गाठी शिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधू मंडळी वरास गाठीची भेट देतात शिवाय शेजाऱ्यांना मित्र जणांना त्यांच्या माळा देण्याची पद्धत आजही पाडल्याचा ते पांढरेशुभ्र गाठी घालून मिळवण्याची विशेषता बच्चे कंपनीमध्ये खूप हौस असते. होळीला पूरणपोळी रंग गुलाल की पिचकारी याचे जसे महत्व आहे.

तसेच गाठीचे आपले एक विशेष मान आहे. त्यामुळे होळीला घरोघरी गाठींची खरेदी होते. यांच्याकडे लहान मुले आहेत. तेथे खाऊ म्हणून होळीला गाठी दिल्या जातात. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घाटाची खरेदी होतेच. त्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याला देखील याच गाठींचा पुजेत वापर करतात. त्यासाठी म्हणून गाठी घेतात यंदा तर  भावात वाढ झाली असल्याचे विक्रीदेखील मंद्दवली झाल्याचे चित्र आहे.

पण पूजेपुरते का असू द्या गाठीची खरेदी होतच असते. मागील काही वर्षापासून गाठ्याची विक्री घटत असल्याची माहिती व्यापारी बोलताना देतात भारतीय सण उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत. त्याचप्रमाणे गाठी देऊन सामाजिक सलोखा कायम राहावा हा उद्देश असावा किंवा आरोग्याच्या दृष्टीने देखील गाठीचे महत्त्व आहे. कारण की वाढते तापमान याच दिवसापासून सुरू होते आणि गाठी आणि पाण्याचे मिश्रण केल्यास आपण साखर पाणीदेखील म्हणू शकतो ते आरोग्यास उत्तम असते.

त्यामुळे देखील या गाठीला गुणवर्धक माध्यमातून ही एक विशेष स्थान आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वावरत असताना फास्ट फूडचा जमाना असताना गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे तरी फोटोसेशन पुरते असुद्या चिमुकल्यांच्या गळ्यात गाठी दिसून येते सध्या गाठीचा दर 100 ते 120 किलोपर्यंत आहे.

 

Protected Content