यावल येथे जुन्या भांडणाच्या रागातून केळीचे घड कापून ६ लाखांचे नुकसान

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दोन दिवसांपुर्वी हरभऱ्याच्या शेतात बकऱ्या चारण्याच्या कारणावरून शेतकऱ्याच्या शेतातील दाने हजार केळीच्या घड कापून सुमारे ६ लाख रूपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल शिवारातील अट्रावल रस्त्यावल असलेल्या डॉ. दिनकर वारके यांच्या मालकीच्या शेतात किशोर देवराम राणे यांनी निम्मे हिस्स्याने शेत केले आहे. या शेतात त्यांनी केळीच्या झाडांची लागवड केली आहे. सोमवार १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या शेतातील केळीच्या २ हजार झाडावरील घड कापून सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान केल्याची घटना समोर आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शेतकरी किशोर राणे यांच्या हरभऱ्याच्या शेतात बकऱ्या चारण्यावरून वाद झाला होता. यात राणे यांना बकऱ्या चारणारे राजेंद्र काशिनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्निल उर्फ भुरा छगन धनगर, धनराज उर्फ बबलू राजू धनगर, एकनाथ तोताराम भिल, अनिल गंगाराम धनगर सर्व रा. यावल यांनी मारहाण करून शेत कशी करतो अशी धमकी दिली होती.   त्यानुसार याच सहा जणांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्याची तक्रार किशोर राणे यांनी यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Protected Content