नागरीकांच्या तक्रारी सोडवा !; खासदारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरीकांच्या समस्या सोडवा आणि तसा अहवाल सादर करावा असे आदेश खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. यावल पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात खा. रक्षा खडसे यांनी तालुक्यातील विविध शासकीय कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला पंचायत समिती, कृषी विभाग, महसूल, विभागाकडील स्वस्त धान्य दुकान, संजय गांधी निराधार योजना या विभागाकडील तक्रारींसह यावल नगरपरिषद ,वीज वितरण, आदिवासी प्रकल्प विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिक विमा योजना, आरोग्य विषयक, गुरांच्या लंपी आजार, घरकुल योजना, गोठयांचा विषयी व विविध प्रलंबीत व रेंगाळलेल्या कामा बाबतचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. त्यात कृषी विभाग महसूल नगरपालिका वीज वितरण कंपनी व घरकुलाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून करण्यात आल्या नागरिकांनी कथन केलेल्या, विविध समस्यांवर खा. खडसे यांनी बैठकीत अधिकारी वर्गांना जाब विचारत धारेवर धरले व तात्काळ समस्या सोडविण्याची व तसा अहवाल सादर करण्याची आदेश दिले आहेत.

बैठकीत बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, राकेश फेगडे , हर्षल पाटील, उमेश फेगडे ,विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, युवा मोर्चाचे सागर कोळी ,सरपंच परिसदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी यांनी विविध कार्यालयांच्या समस्या सुटत नसल्याच्या व्यथा सांगितल्या. त्यात वीजवितरण कंपनीकडून जळालेल्या डीपी लवकर मिळत नसल्याचे सांगून ग्रामीण भागात वायरमन उपस्थित राहत नाही व ग्रामीण भागातील वीज खंडणी झाल्यास वायरमन जोडणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीवरून खासदार खडसे यांनी वीज वितरण कंपनीला धारेवर धर वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व वायरमन यांच्या संपर्क क्रमांकासह कार्यालयाबाहेर फलक लावण्याचे आदेश दिले आहेत.

व्यासपीठावर व्यासपीठावर तहसीलदार महेश पवार, प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, जिल्हा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, पं.स.च्या माजी सभापती, पल्लवी चौधरी, जि.प. माजी सदस्य, सविता भालेराव, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांचे सह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

Protected Content