द्वारकानगरात घरफोडी; 1 लाखाचा मुद्देमाल लंपास

chori1

जळगाव प्रतिनिधी । आजोबांचे निधन झाल्याचे त्यांच्या उत्तरकार्यासाठी गावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाला लंपास केल्याची घटना आज द्वारका नगरात सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उमेश रमेश नारखेडे वय-32 रा. द्वारका नगर यांचे आजोबांचे 24 जानेवारी निधन झाले होता. त्यानिमित्ताने रूईखेडा येथे जातांना घराला कुलुप लावून कुटुंबियांसह गावाला निघून गेले. आज सकाळी 8 वाजता शेजारच्यांनी फोन करून घराचे कुलुप तोडलेले असल्याचे सांगितले. दुपारी 11 वाजता घरी येवून पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरातील 10 ग्रॅम सोन्याची चैन, 5 ग्रॅम कानातले टॅप्स, 5 ग्रॅम वजनाचे दोन अंगठ्या, 6 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 3 ग्रॅम वजनाची नथ, 1 ग्रॅम वजनाची सोन्याची सटी आणि 4 हजार रूपये रोख असा एकुण 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. उमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content