समाज निर्मितीसाठी महिला, तरुणींनी प्रशिक्षण घेतलेल्या कौशल्यांचा वापर करा – आ.सुरेश भोळे

nimjai foundatriod

जळगाव प्रतिनिधी । महिला व तरुणींनी चूल आणि मूल या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. शासनाच्या कौशल्य विकास योजनेतंर्गत महिला व तरुणींसाठी विविध कौशल्य असलेले अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. योजनेचा महिला तरुणींना लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. निमजाई फाऊंडेशतर्फे सोमवारी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आपल्यातील कला, कौशल्य समाजासाठी उपयोगी ठरत नसतील, ती कला तसेच कौशल्य व्यर्थ आहे. त्यामुळे कौशल्य विकास योजनेतंर्गत प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या महिला तसेच तरुणींनी इतरांना उभे राहण्याकरीता म्हणजेच समाज निर्मितीसाठी उपयोग करावा. शिक्षणाबरोबरच महिला तरुणींनी संस्कार व आपली संस्कृती टिकवली पाहिजे, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या प्रदेश संयोजिका प्रा. डॉ. अस्मिता पाटील, मयुरेश गारमेंट कंपनीच्या संचालिका किर्ती वारके, निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शितल पाटील-बाक्षे, सचिव भूषण बाक्षे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तसेच सरस्वती मातेच्या देवीला पुष्पहार करुन मान्यरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शितल पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सुरेखा सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश पाटील, दिपक जावळे, विवेक जावळे, रुपम जावळे, कुणाला कोलते, शिक्षिका रंजना पाटील, हेमलता इंगळे, अर्चना पाटील, रुपाली पाटील, योगीता सपकाळे, भाग्यश्री चौधरी, पूनम चौधरी, नितू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

प्रशिक्षणाव्दारे आत्मनिर्भरतेसाठी मदत
प्रा.डॉ. अस्मिता पाटील यांनी मनोगतात शासनाची कौशल्य विकास योजनेतील अभ्यासक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार्‍या निमजाई फाउंडेशनचे कौतुक केले. विद्यार्थीनींनी प्रशिक्षणाचा उपयोग दुसर्‍या करुन रोजगारक्षम होवून इतरांनाही रोजगारक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. हे प्रशिक्षणाव्दारे मिळालेले कौशल्य तुमची ताकद असून आत्मनिर्भरतेसाठी भविष्यात याची मदत होईल, असे सांगितले. तर किर्ती वारके यांनीही एकीने शिकून दहा जणानी तयार करावे हा विचार करुन स्वतः बिझनेस व्युमन म्हणून समाजासमोर यावे असे आवाहन केले.

या विजेत्यांचा झाला सन्मान
निमजाई फाऊंडेशनतर्फे जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्ताने 15 जुलै रोजी फॅशन शोसह विविध स्पर्धा पार पडल्या होत्या. यातील विजेत्या रुपाली पाटील, अर्चना पाटील,आलोया चंदनानी, प्रेरणा चौधरी, मेघा घुसर, आर्शिन शिरपूरकर, पूजा सैनी, नितू चौधरी, मेघा भालेराव, संजना मेघवानी, रुपाली कापडाने, दीक्षा भोळे, रुपाली कोष्टी, माला सपकाळे, सरिता बारी, किरण काचवानी, सुनंदा कोळी, जया निशा, प्राची तोडकर या विद्यार्थीनींना मान्यवरांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थीनींना शासकीय प्रमाणपत्राचेही मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.

Protected Content