क्रीडाशिक्षक व खेळाडू यांना न्याय देणार– ना.गुलाबराव पाटील(व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारथी डॉ. नारायण खडके, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, नगरसेवक नितीन बरडे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

क्रीडा संकुलाचा अध्यक्ष या नात्याने क्रीडाशिक्षक ,खेळाडू, व क्रीडा संघटना यांना योग्य न्याय दिला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले तर कोरोना काळात क्रीडाशिक्षक यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर यांनी पुरस्कारा विषयी माहिती सचिव राजेश जाधव यांनी दिली तर आभार उपाध्यक्ष प्रशांत जगतात यांनी मानले.

जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव पुरस्कार-  गोविंदा जुलाल पाटील (आदर्श कन्या विद्यालय भडगाव),  जिल्हास्तरीय क्रीडा गौरव पुरस्कार- प्रा. डॉ. रणजित शामराव पाटील (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव).

जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार-
शेख सादिक शेख इमाम (ग्रामविकास विद्यालय हरेश्वर पिपळगाव ता. पाचोरा), संदिप हिरामण पवार (नागरिक शिक्षण मंडळाचे विद्यालय तामसवाडी ता. पारोळा), दिपक कृष्णा चौधरी (ना. आ. बोरसे विद्यालय शहापूर ता. जामनेर), देविदास हिरामण महाजन (झि. तो. महाजन विद्यालय धानोरा ता. चोपडा), विजय मारोती लोंढे (जे. ई. स्कुल मुक्ताईनगर), बालू देवराम साळुंखे (गो. पु. पाटील विद्यालय कोळगाव ता. भडगाव), किशोरकुमार उत्तमराव पाटील (माध्यमिक विद्यालय विरोदा ता. यावल), राजेश श्रीराम अंजाळे (न. ह. रांका विद्यालय बोदवड), सचिन लोटन सुर्यवंशी (सारजाई कुडे विद्यालय धरणगाव), प्रा. मनोज नत्थु पाटील (दादासाहेब डी. एस. पाटील कनिष्ठ महाविद्यालय एरंडोल), लक्ष्मीकांत वसंत नेमाडे (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव ता. भुसावळ), प्रशांत सुधाकर महाजन (माध्यमिक विद्यालय कुसुम्बा ता. जळगाव), अजय गोपाळराव देशमुख (राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव), सुनिल प्रभाकर वाघ (जी. एस. हायस्कुल अमळनेर), अविनाश राजधर महाजन (वा. कृ. पाटील विद्यालय मस्कावद ता. रावेर), प्रा हरीश मुरलीधर शेळके (अॅड. एस. ए. बाहेती कनिष्ठ महाविद्यालय जळगाव), जितेंद्र किसन शिंदे (सेंट टेरेसा कॉन्व्हेट स्कुल जळगाव).

यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, किशोर पाटील, योगेश सोनवणे, समीर घोडेस्वार, विजय विसपुते, गिरीश महाजन, उमाकांत जाधव, पंकज पाटील, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ व जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/715103836072087

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/371358794094495

 

Protected Content