आदिवासी संघर्ष समीतीची बैठक उत्साहात

यावल प्रतिनिधी । आदिवासी संघर्ष समीतीची यावल तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर व जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत व तालुक्यातील कोळी समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. 

बैठकीत कोळी समाजास आदिवासी दाखल्यासह वैधता प्रमाणपत्र मिळावित यासाठी माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली ९ डीसेंबरला मुंबईत आयोजीत आक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थीत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस मोर्चाचे संयोजक अँड. गणेश सोनवणे, उतर महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे ,महिला जिल्हाध्यक्ष सुनिता तायडे ,संजय कांडेलकर ,समाधान मोरे, मनोहर कोळी ,प्रशांत सोनवणे आदीची प्रमुख उपस्थीती होती. आदिवासी संघर्ष समीतीच्या वतीने कोळी समाजास जातीचे प्रमाण पत्रासह वैधता प्रमाणपत्र मीळावे यासह विविध अडी-अडचणी बाबात मुंबर्ठत आझाद मैदानावर ९ डीसेंबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत मोर्चा बाबत माहीती देण्यात आली तसेच समितीच्या विविध तालुका कार्यकरणी व जिल्हा पातळीवर नियूक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना मान्यवराच्या हस्ते नियूक्तीपत्र देण्यात आले.

बैठकीत अँड गणेश सोनवणे, प्रभाकर सोनवणे, संजय कांडेलकर, खेमंचद कोळी ,किरण कोळी, संदिप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीस तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्तविक व सुत्रसंचालन खेमंचद कोळी यांनी केले तर उपास्थिताचेआभार भरत कोळी यांनी मानले.

Protected Content