सुनिता इंगळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

faijpur satkar

फैजपूर, प्रतिनिधी | येथील बशिप्र संचलित प्राथमिक विद्यामंदिर, फैजपूर शाळेतील विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सुनिता सोपानराव इंगळे यांना नुकतेच (दि.१०) “भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९” ने खा.रक्षाताई खडसे व मान्यवरांच्या हस्ते लेवा भवन येथे सन्मानित करण्यात आले.

 

येथील सरदार वल्लभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, रोटरी क्लब जळगाव सेंट्रल व युवा विकास फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे संपन्न झाले. व्यासपीठावर परमपूज्य शास्त्री पुरुषोत्तम प्रकाश राजनी महाराज शास्त्री, गोविंद प्रकाशदासजी, खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजूमामा भोळे, हाजी गफ्फार मलिक, डॉ.करीम सालार, डॉ.ए.जी. भंगाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष ना.सौ. उज्वलाताई पाटील, रोटरी क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयूर, सुशील राका, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रमाचे माजी महापौर तथा नगरसेवक विष्णू भंगाळे तसेच रोटरी क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयुर व मित्रमंडळ यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आदर्श शिक्षिका सुनिता इंगळे यांच्यासह प्रा.उमाकांत पाटील, धांडे कोचिंगचे प्रा.एम.एन. फालक, सौ.अनुश्री फालक, डॉ.प्रशांत फालक, संतोष पाटील, प्रा. अतुल इंगळे, तारेश पाटील परिवारासह मित्र मंडळ तसेच जिल्ह्याभरातील मान्यवर शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती सुनिता इंगळे यांचे आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content