प्राथमिक शाळेत व्हर्च्युअल कला महोत्सवाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर मध्ये शाळास्तरीय कला महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले.

 

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत व्हर्च्युअल कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक वैशाली पाटील, जयश्री वंडोळे, कला महोत्सव प्रमुख आकाश शिंगाणे यांनी सरस्वती देवीचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कला महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी अभिवाचन, वकृत्व आणि एकल नृत्य या कलाप्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यात अभिवाचनात ओजस्वी राजेंद्र पाटील प्रथम, अनुश्री मनिष देशपांडे द्वितीय तर निलेश प्रवीण सोनवणे याने तृतीय स्थान पटकवला. वकृत्व स्पर्धेत प्रथम :- युगान संजय बेहेरे द्वितीय :- सिद्धेश गणेश चव्हाण, एकल नृत्य प्रथम :- धनश्री सतीश पाटील (लहान गट) आयुष्य सुनील कुलकर्णी (मोठा गट) द्वितीय :- संस्कृती सतीश हटकर (लहान गट), दिव्या धनराज राठोड (मोठा गट) हे विजयी ठरले तसेच दुसऱ्या दिवशी सुगम गायन, वाद-विवाद, नाट्यछटा या स्पर्धा घेण्यात आल्या.

सुगम गायन स्पर्धेत प्रथम :- आंशुला महेंद्र वाणी (लहान गट), नेहा गणेश चव्हाण (मोठा गट), द्वितीय :- हेरंब मनोज कुलकर्णी (लहान गट), भैरवी भूषण खैरणार (मोठा गट). नाट्यछटा प्रथम :- दर्शिता संतोष मुगल द्वितीय :- अनुश्री मनिष देशपांडे, तृतीय :- हिमानी प्रशांत सोनार. वाद विवाद स्पर्धा प्रथम :- नेहा भरत सुरळकर व अनुश्री मनिष देशपांडे (मोठा गट) हिमानी प्रशांत सोनार व दर्शिता संतोष मुगल (लहान गट) हे विजयी ठरले तसेच निबंध, चित्रकला, रांगोळी, किल्ले बनवणे, एकल वादन यासारख्या स्पर्धाही घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून आपले कलाप्रकार उत्साहात सादर केले. त्यासाठी पालकांनीही शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आकाश शिंगाणे यांनी केले. मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक वैशाली पाटील तसेच सचिन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व सहकारी शिक्षकांनी कामकाज पहिले.

Protected Content