रेडिओलॉजी विभागातर्फे भव्य एमआरआय तपासणी शिबिर

जळगाव प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागातर्फे शुक्रवार, २१ जानेवारीपासून भव्य एमआरआय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रथम १५० रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ३० जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरु राहणार आहे.

अर्थातच सवलतीचे केवळ ९ दिवस असून ह्या संधीचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली तज्ञ डॉक्टरांच्या उपचारासह एमआरआय, सीटीस्कॅन, सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. निशुल्क शस्त्रक्रिया अभियानांतर्गत खास रुग्णांच्या सोयीसाठी एमआरआय शिबिराल शुक्रवार, २१ पासून सुरुवात करण्यात येत असून अल्पदरात विविध एमआरआय, सीटीस्कॅन केले जात आहे. प्रथम १५० रुग्णांना यात प्राधान्य दिले जाणार असून रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या आणि अ‍ॅडमीट असलेल्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

 कोणकोणते एमआरआय होतात 

यात ब्रेन, स्पाईन,जॉईंटचा एमआरआय, संपूर्ण स्पाईन, वर्टिगो प्रोफाईल ज्यात ब्रेन, एनजीओ, सर्वाइकल असे एमआरआय केले जातात. साधारणत : २ ते ६ हजारापर्यंत येथे एमआरआय करुन दिले जात आहे, त्यासाठी तंत्रज्ञांची टिम येेथे कार्यरत असून या दिपक पाटील, अतुल इसाक, पुर्वेश महाजन यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी निलीमा पाचपांडे यांच्याशी ९५४५९०१४०३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

अल्पदरात सीटी स्कॅनसह सोनोग्राफीची सुविधा 

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अल्पदरात सोनोग्राफीसह सीटी स्कॅनचीही सुविधा उपलब्ध आहे. येथे मेंदू, पोटासह छातीचा सीटी स्कॅन आदि स्कॅन केले जातात. यात कोरोना चाचणीसाठी छातीचा सीटी स्कॅन हा उपयुक्‍त ठरतो. याशिवाय पोटाची सोनोग्राफी ही आतापावेतो ५०० रुपयात करण्यात येत होती, मात्र गरजू रुग्णांसाठी २१ जानेवारीपासून केवळ ३०० रुपयात पोटाची सोनोग्राफी तज्ञांकडून करण्यात येत आहे. याशिवाय गरोदर मातांची सोनोग्राफी ही मोफत करण्यात येते.

Protected Content