कन्नड घाटाच्या दुरुस्तीसाठी बुधवारी तातडीची बैठक

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज कन्नड घाटात सतत मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सोबत घेवून घाटाची पाहणी केली.तातडीने या घाटातील खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सहा तारखेला बैठक घ्यावी अशा सूचना  संबधित यंत्रणेला केल्याने कन्नड घाटातून जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

जळगाव धुळे औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्ता मोठ-मोठे खड्डे पडल्याने नादुरुस्त झाला होता. या मुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते याबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे सातत्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज कन्नड घाटात सतत मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सोबत घेवून घाटाची पाहणी केली.

या घाटातील रस्त्यातील जागोजागी खड्डे पडले असल्याने  वाट अधिक खडतर झाली आहे.तातडीने या घाटातील रस्त्याची वाहतूक  सुरळीत राहवी. यासाठी अंतीम पत्रच “नहि” ला दिल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पाठपुराव्यातून कन्नड घाटातून प्रवास करणाऱ्या जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 55 (जुना महामार्ग क्रमांक 211) दुरुस्त करण्यात यावा. यासाठी सोशल मीडियावर जोरदार मागणी सुरू झाली होती. कन्नड घाटात सुमारे आठ किलोमीटरचा रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडल्याने तसेच बाजूचे बॅरिकेट्स तुटल्याने व पाऊसाचे पाण्याचा निचरा होण्याच्या अडचणी वाढल्याने रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती.सातत्याने आठ-दहा तास वाहतुकीची कोंडी होत असल्याने कन्नड घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले होते. वाहतूक पोलीस प्रशासन देखील दररोजच्या वाहतूक कोंडी सूरुळीत करण्यात हैराण झाली होती. 

कन्नड घाटात सातत्याने ट्राफिक जाम झाल्याने प्रवाशी नागरिक व वाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद येथील प्रकल्प संचालक यांना आपल्या तातडीने कन्नड घाटात  बोलावून त्यांना या कन्नड घाटाची दुरावस्थाची पाहणी करून  तातडीने कार्यवाही करा. अशी मागणी यापूर्वी देखील केली होती. यासाठी एक दिवस घाट रस्ता बंद ठेवला होता. मात्र यावेळी सरदार पॉईंट ते म्हसोबा मंदिर पर्यंत असलेल्या खड्यांची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. यामुळे प्रवाशांची तक्रारी तशाच राहिल्या. यासर्व पार्श्वभूमीवर यासर्व रस्त्यांची अंतीम दुरुस्ती करावी. अन्यथा मला जनतेसोबत आपल्या विरोधात आंदोलनाची भूमिका लागेल.असा सज्जड दम आपल्या अंतीम स्मरण पत्रात नमूद केल्याने तातडीने कार्यवाही होईल अशी आशा निर्माण झाली आहे. बुधवारी या बैठकीत वन्यजीव वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच वाहतूक पोलिस अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच कन्नड घाटाच्या  रस्त्याची दुर्दशा संपणार आहे.

 

Protected Content