युवासेनेच्या राज्य सहसचिवपदी विराज कावडीया यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही संधी आव्हानातमक आणि मोठी आहे.  शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच शिवसैनिकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा  विश्वास विराज कावडीया यांनी व्यक्त केला आहे.

 

या नियुक्तीबद्दल माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, अजिंक्य चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना युवती विस्तारक डॉ. प्रियांका पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराजजी पाटील व सर्व शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्याने यांनी केले आहे.

Protected Content