केसीईच्या पी.जी. महाविद्यालयात एक दिवसीय शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केसीईच्या पी.जी. महाविद्यालयात सोमवारी १० जानेवारी रोजी दुपारी एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  प्राचार्य अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे,  प्रमुख अतिथी कॉलेज ऑफ एज्येकेशनचे  प्राचार्य डॉ. अशोक राणे, IQAC समन्वयक व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख  प्रा. संदीप पाटील  हे  उपस्थितीत  होते.  प्राचार्य अशोक राणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, नव्याने समाविष्ट झालेल्या शिक्षकांच्या शैक्षणिक  गरजा लक्षात घेऊन हा कार्यक्रम काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. प्रा. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले, ते म्हणाले इंडक्शन प्रक्रिया नवीन नियुक्त्यांचे स्वागत करते आणि त्यांना त्यांच्या नवीन भूमिकेत प्रवेश करण्यास मदत करते. प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रथम बीजभाषण  कॉलेज ऑफ एडुकेशन चे  प्राचार्य. डॉ. अशोक राणे यांनी केले. त्यांनी खान्देश एज्यूकेशन सोसायटीच्या ध्येय आणि धरणे याबाबत ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे  यांनी  नवीन कर्मचार्यांना त्यांचे काम करण्यासाठी आवश्यक असलेली विशिष्ट माहिती प्रदान करण्यासाठी आणि उद्दिष्टे  निश्चित करण्यासाठी, कर्मचारी इंडक्शन हे कामाच्या ठिकाणी धोरणे आणि कार्यपद्धतींची रूपरेषा तयार करण्याचे एक प्रभावी आणि कार्यक्षम असल्याचें सांगितले. प्रा. केतन नारखेडे  यांनी कर्मचार्यांरना संस्थेची व महाविद्यालयाची  धोरणे आणि कार्यपद्धती तर प्रा. जे. एन. चौधरी यांनी महाविद्यालयीन  संशोधनातं भर घालण्यासाठी संशोधन प्रकल्प ,प्रबंध लेखन या संबंधी माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी प्राध्यापकांशी हितगुज करतांना  काम सुरक्षितपणे कसे करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याचे प्रशिक्षण समाविष्ट केले पाहिजे,कर्मचार्यांरना धोरणे आणि कार्यपद्धती आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षितता यांचे पालन करण्याबद्दल शिक्षित करा;शैक्षणीक  छाप निर्माण करून महाविद्यालयांची प्रतिष्ठा वाढवा असे प्रतिपादन केले. एक दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यालयीन कार्यपद्धतींशी संबंधित विविध समस्यांवर वक्त्यांसोबत संवादात्मक सत्रांचा समावेश करण्यात आला .कार्यक्रम यशस्वीतेसाठी IQAC समन्वयक  प्रा. संदीप पाटील , प्रा. आर. एम.पाटील  प्रा.जे. व्ही खान ,प्रा. डी. आर न्हावी ,  शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या सर्व प्राद्यापकांनी  सक्रिय सहभाग घेतला.

Protected Content