जावेद हबीब याच्यावर कडक कारवाई करा – हिदूंराष्ट्रसेनेची मागणी

जळगाव, प्रतिनिधी | प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आर्टिस्ट जावेद हबीब (हकीम) यांनी एका कार्यक्रमात महिलेचा अवमान केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिदूंराष्ट्रसेना उत्तर महाराष्ट्र संर्पक प्रमुख मोहन तिवारी यांनी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आर्टिस्ट जावेद हबीब (हकीम) यांनी नुकतेच ऐका कार्यक्रमामध्ये केशरचनेचे प्रारत्यक्षिक दाखवंताना पाणी संपले म्हणुन अनेक महिला समोर ऐका महिलेच्या डोक्यावर थुकुंन तिचा अवमान करत उर्वरित केशरचना पुर्ण केली . सदर महिलेने त्याच रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  हा प्रकार हा अतिशय निंदनीय व  निषेधार्थ आहे.  हा अपमान केवळ त्या  महिलेचाच नसून  संपुर्ण स्त्रिवर्गाचा आहे. कोरोना काळात मास्क वापरणे अनिर्वाय आहे असे असतांना असे जाहीर कार्यक्रमात मास्क न वापरता सर्वान समोर थुकंणे हा आपत्ती निवारण कायद्याच्या दुष्टीने गुन्हा आहे. भारतीय संविधानाने भारतीय स्त्रियांच्या आत्मसम्मानासाठी कायदे बनवले आहे. त्या कायद्यानवे हे कृत्य गुन्हा ठरते.  भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्य साधारण महत्व आहे. माता सिता, दौपाद्री, संत मीरा, संत मुक्ताई, संतसखु जनाबाई,राजमाता जिजाबाई,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,झांशीची राणी लश्मीबाई, राणी पद्दवती, सावित्रीबाई फुले,माजी पतंप्रधान स्वः इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील इः भगिनी निवेदिता अशा सर्व महिलांना पूजनीय वंदनीय असे म्हटले आहे.  आपल्या संस्कृती मध्ये स्त्रियांना माते समान म्हटले जाते.  हा संस्कृतीचा आणि समस्त माता वर्गाचा अपमान असल्याने हिदूंराष्ट्रसेना  जावेद हबीब (हकीम) यास त्वरित अटक करुन त्यावर कठोर कारवाई करावी,  जावेद हबीब( हकीम) याच्या जेवढ्या ठिकाणी त्याच्या दुकाने आणि फ्रच्यायजी आहे तेवढ्या ठिकाणी चौकशी करुन येणाऱ्या इनकमचे काही काळे गोरे तर नाही याची चौकशी करुन कारवाई करावी. महाराष्ट्रात जेवढ्या ठिकाणी त्यांची दुकाने कायम स्वरुपात बंद करण्यात यावी जेणे करुन पुढे अशी कोणी हिमंत करणार नाही अशी मागणी निवेद्नावारे करण्यात आली आहे. निवेदनावर हिदूंराष्ट्रसेना उत्तर महाराष्ट्र संर्पक प्रमुख मोहन तिवारी, ऋषी लुल्ला, अजय मंधान, राज सपकाळे, मयूर मंधान, सुशील इंगळे, रुपेश माळी यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content