प्रभाग समिती सभापतींची निवड बिनविरोध

jalgaon mahapalika

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या चार प्रभाग समित्यांचा सभापतींची निवडीसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु चार प्रभागांसाठी आज चारच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, उद्या फक्त औपचारिक घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेने एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नाही.

 

२१ रोजी सभापतींच्या निवडीसाठी विशेष महासभा घेण्यात येणार होती. मात्र, जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा दौºयामुळे ही विशेष महासभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ही महासभा उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची मूदत होती. त्यानुसार प्रत्येक प्रभाग एक असे एकूण चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, प्रभाग समितींची रचना करताना भाजपाने कोणत्याही प्रभागात शिवसेनेचा प्रभाग समिती सभापती होणार नाही. याची दक्षता घेतली. अगदी एमआयएमला सोबत घेवूनही शिवसेनेला कोणत्याही प्रभागात संधी नसल्याचे लक्षात आल्यामुळेच सेनेने अर्ज देखील भरला नाही.

Add Comment

Protected Content