मसूद अझहरच्या दोन भावांसह ३५० दहशतवादी ठार

Key Jaish e Mohammed operat

नवी दिल्ली (प्रतिनिधी) भारतीय हवाई दलाने ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांच्या साह्याने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३५० दहशतवाद्यांसह मसूद अझहरचे दोन भाऊ देखील ठार भारत सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे.

 

मिराज विमानांमधून दहशतवाद्यांच्या तळांवर सहा बॉम्ब टाकण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. भारतीय हवाई दलाने ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांच्या साह्याने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे भारत सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यात ३२५ दहशतवादी तर २५ शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा समावेश असल्याची माहितीही हाती आली आहे.

 

मसूदचे दोन भाऊ ठार

काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार असलेला जैशचा दहशतवादी मुफ्ती अझर खान काश्मिरी आणि जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर हा आजच्या हल्ल्यात मारला गेला आहे. १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ या विमानाचं अपहरण ज्या दहशतवाद्यांनी केलं होतं, त्यात इब्राहिमचा समावेश होता. अफगाणिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा आणखी एक मुख्य सूत्रधार मोलाना अम्मर आणि मसूद अझरचा आणखी एक भाऊ मौलाना तल्हा सैफ याचाही या हल्ल्यात खात्मा झाला आहे.

Add Comment

Protected Content