वकील संघाला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

0

WhatsApp Image 2019 02 26 at 6.55.38 PM

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्हा वकील संघाला पोलीस मुख्यालयाच्या परीसरात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा वकील संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पंढरीनाथ चौधरी, सचिव ॲड.योगेश गावंडे, जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके, वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड.प्रकाश पाटील, ॲड. भरत देशमुख, ॲड. संजय राणे हे उपस्थित होते.

सदरील मागणीचे निवेदन देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टाच्या जागेसंदर्भात माहिती जाणून घेत माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे, आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुभाई पटेल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. तसेच निवेदनासंदर्भात सविस्तर चर्चा करून साकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स’न्यूजशी बोलतांना सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!