Home राजकीय शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला !

शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला !

0
43

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला.

महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही काँग्रेस सतीश चतुर्वेदींच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यामुळे पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार माजी मंत्री फौजिया खान यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे.


Protected Content

Play sound