‘तर माझी मुलगी आत्महत्या करेल’ – मंत्री आव्हाड यांच्या विधानावर भाजप आक्रमक

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । मुख्यमंत्री यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर देखील इडीकडून करण्यात आलेल्या कारवाईची चर्चा आहे. श्रीधर पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर मंत्री आव्हाड यांनी ‘माझ्या मुलीला इथे नुसतं बोलवलं तरी ती आत्महत्या करेल’, असे खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून आ. आशिष शेलार यांनी आक्षेप घेत आदित्य ठाकरें यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे असेही शेलार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावर इडीकडून कारवाई करण्यात आली. यानंतर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना हे विधान केले आहे. ‘माणसाला कोणती न कोणती भीती असते. रात्री ३ वाजता टकटक केले, तर… काय प्रतिक्रिया येईल, या अशात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नसतो. अशात माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल. त्यापेक्षा मला वाटतं की तिने या देशात राहू नये’  असे आव्हाड म्हणाले .

राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ‘मंत्री पदावर बसलेली व्यक्ती जी या राज्याच्या मंत्रीपदावर आहे. महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य आणि देशभरातच नव्हेतर जगभरात महाराष्ट्रातील बिकट परिस्थितीतील राज्य आहे असाच प्रचार करत आहेत, मग हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा प्रश्न भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला. शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून थेट आदित्य ठाकरें यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी असेही  आ. शेलार म्हणाले.

 

Protected Content